महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

खाद्यतेलाच्या दरात महिनाभरात १५ टक्क्यांहून अधिक वाढ; जाणून घ्या नेमके कारण - खाद्यतेल

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटप्रमाणे गेल्या महिन्यात मोहरीच्या तेलाचे दर प्रति किलो १२ रुपयांनी वाढले आहेत. गतवर्षी १० डिसेंबरला मोहरीचे तेल प्रति किलो १२४ रुपयांनी विकण्यात येत होते. चालू वर्षात १० जानेवारीला मोहरीचे तेल प्रति किलो १३६ रुपयांनी विकण्यात येत आहे.

Edible oil
खाद्यतेल

By

Published : Jan 11, 2020, 12:19 PM IST

नवी दिल्ली - गेल्या महिनाभरात कच्च्या पामतेलाचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मलेशियामधून आयात करण्यात येणाऱ्या पामतेलावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर पामतेलासह खाद्यतेलाचेही दर वाढत आहेत.


केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाईटप्रमाणे गेल्या महिन्यात मोहरीच्या तेलाचे दर प्रति किलो १२ रुपयांनी वाढले आहेत. गतवर्षी १० डिसेंबरला मोहरीचे तेल प्रति किलो १२४ रुपयांनी विकण्यात येत होते. चालू वर्षात १० जानेवारीला मोहरीचे तेल प्रति किलो १३६ रुपयांनी विकण्यात येत आहे. गेल्या महिन्यात पामतेलाला प्रति किलो ९१ रुपयांनी विकण्यात येत होते. या महिन्यात पामतेलाचे दर प्रति किलो १०४ रुपये झाले आहेत. गेल्या महिन्यात सोयबीनच्या तेलाला प्रति किलो १०६ रुपये दर होता. जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या तेलाचा दर प्रति किलो १२२ रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा-अॅमेझॉनचा १९ जानेवारीपासून सुरू होणार 'ग्रेट इंडियन सेल'


सरकारचे मलेशियातील खाद्यतेलाच्या आयातीवर निर्बंध-
केंद्र सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये मलेशियामधून आयात करण्यात येणाऱ्या खाद्यतेलावरील ५ टक्के आयात शुल्क रद्द केले. त्यानंतर नुकतेच मलेशियामधून कच्चे पामतेल आयात करण्यावरही निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे देशातील खाद्यतेल उद्योगांना कच्च्या पामतेलावर प्रक्रिया करून शुद्ध पामतेल बाजारात विकावे लागणार आहे. अशा स्थितीत देशातील पामतेलाचे दर वाढले आहेत. पामतेलाचे दर वाढल्याने इतर खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.

हेही वाचा-मलेशियाकडून पामतेल आयात थांबवा; सरकारची उद्योगांना सूचना

सोयाबीनच्या उत्पादनात घट-
चालू वर्षात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. देशात रब्बी हंगामात अपेक्षेहून कमी प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपातील सोयाबीनचे उत्पादन हे १८ टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनच्या तेलाचे उत्पादन कमी झाले आहे.

भारत हा खाद्यतेलाचे आयात करणारा जगातील आघाडीचा देश आहे. देशातील खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी भारताला बहुतांश आयातीवर अवलंबून राहावे लागते.

ABOUT THE AUTHOR

...view details