महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

येस बँक घोटाळा : ईडीकडून 'या' तीन ठिकाणी झडती - Rakhee Kapoor Tandon

येस बँकेतील घोटाळ्याचा तपास वाढविल्याचे ईडीमधील सूत्राने सांगितले. नवी दिल्ली व मुंबईमधील राणा कपूर यांच्या तीन मुलींच्या निवासस्थानी झडती घेण्यात आल्याचे ईडीमधील सूत्राने सांगितले. राखी कपूर टंडन, रोशनी कपूर आणि राधा कपूर अशी राणा कपूर यांच्या मुलींची नावे आहेत.

Rana Kapoor
राणा कपूर

By

Published : Mar 7, 2020, 7:10 PM IST

नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची आज चौकशी केली आहे. त्यानंतर तपास वाढवित कपूर यांच्या तीन मुलींच्या निवासस्थानी झडती घेतली आहे.

येस बँकेतील घोटाळ्याचा तपास वाढविल्याचे ईडीमधील सूत्राने सांगितले. नवी दिल्ली व मुंबईमधील राणा कपूर यांच्या तीन मुलींच्या निवासस्थानी झडती घेण्यात आल्याचे ईडीमधील सूत्राने सांगितले. राखी कपूर टंडन, रोशनी कपूर आणि राधा कपूर अशी राणा कपूर यांच्या मुलींची नावे आहेत. येस बँकेतील घोटाळ्याचा तिन्ही मुलींना फायदा झाल्याचा सूत्राने दावा केला आहे. कपूर यांच्या कार्यालयात ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारपासून चौकशी केली आहे.

हेही वाचा -खरंच येस बँकेवरील संकट टळू शकले असते का?

ईडीने मुंबईमधील येस बँकेच्या संस्थापकाच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री झडती घेतली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी राणा कपूर यांना थोडा विश्रांती वेळ विश्रांती देत शुक्रवारी रात्रभर चौकशी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिवाण हाऊसिंग फायनान्सला (डीएचएफएल) कर्ज दिल्याप्रकरणी कपूर यांना प्रश्न विचारण्यात आले आहेत.

हेही वाचा -आरबीआयच्या निर्बंधानंतर येस बँकेवर 'हे' नियम लागू होणार

कपूर यांच्यावर मनी लाँड्रिगचा गुन्हाही ईडीने नोंदिवला आहे. तसेच कपूर यांनी विदेशात पळून जावू नये, यासाठी लुक आऊटची नोटीसही बजाविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details