नवी दिल्ली - कर्ज थकवून बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राला संकटात टाकणाऱ्या आयएल अँड एफएस कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सक्त आर्थिक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आयएल अँड एफएसच्या चार माजी संचालकांच्या मुंबईमधील घर व कार्यालयाची झडती घेतली. या संचालकांचा मनी लाँड्रिंगमध्ये समावेश असल्याचा ईडीला संशय आहे.
आयएल अँड एफएसच्या ४ माजी संचालकांच्या कार्यालयासह घरात ईडीची झडती - ईडी
आयएल अँड एफसने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहेत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी आणि पतमानांकन संस्थाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला होता.

ईडी
राजेश कोटियान, शहजाद दिलान, मनु कोचर आणि मुकुंद सप्रे अशी आयएल अँड एफएसच्या माजी संचालकांची नावे आहेत. आयएल अँड एफसने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहेत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी आणि पतमानांकन संस्थाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला होता. केंद्र सरकारने कंपनीवर ऑक्टोबरमध्ये नवे संचालक मंडळ नियुक्त केले आहे. उदय कोटक यांच्या अध्यतेखालील आयएल अँड एफएसचे नवे संचालक मंडळ कंपनीची मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत आहे.