नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर व त्यांचे पती दिपक यांची सलग पाचव्या दिवशी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली. व्हिडिओकॉनला १ हजार ८७५ कोटींचे कर्ज देताना अनियमितता व नियमांचे उल्लंघन केल्याचा कोचर यांच्यावर आरोप आहे.
चंदा कोचर यांच्या मागील ईडीचे 'शुक्लकाष्ठ' संपेना, पाचव्या दिवशीही चौकशी - ICICI Bank
व्हिडिओकॉन चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्याबरोबर झालेल्या व्यावसायिक सौद्याबाबत कोचर यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच आर्थिक व्यवहाराबाबतही चौकशी केल्याचे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
![चंदा कोचर यांच्या मागील ईडीचे 'शुक्लकाष्ठ' संपेना, पाचव्या दिवशीही चौकशी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3307050-586-3307050-1558089376596.jpg)
ईडीचे मुख्यालय हे दक्षिण दिल्लीतील खान मार्केटमध्ये आहे. या मुख्यालयात कोचर दाम्पत्य हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचले. यावेळी कोचर दाम्पत्याने ईडी अधिकाऱ्यांना सादर करण्यासाठी नवीन कागदपत्रे आणली होती. काही वेळानंतर त्यांची ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. व्हिडिओकॉन चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्याबरोबर झालेल्या व्यावसायिक सौद्याबाबत कोचर यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच आर्थिक व्यवहाराबाबतही चौकशी केल्याचे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
असे आहे व्हिडिओकॉनच्या कर्ज वाटपाचे प्रकरण-
व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकेडून २००९ ते २०११ दरम्यान १ हजार ८७५ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यामध्ये अनियमितता झाल्याचा चंदा कोचर यांच्यावर आरोप आहे. दीपक कोचर यांची मालकीची कंपनी न्यूपॉवरच्या खात्यावर बेकायदेशीर पैशाचे हस्तांतरण झाल्याची माहिती ई़डीला मिळाली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात कोचर पती-पत्नींची मुंबईत ईडीने चौकशी केली. ईडीने मार्चमध्ये कोचर यांचे घर आणि कार्यालयाची झडतीही घेतली होती. तसेच कोचर यांच्याबरोबर व्हिडिकॉन ग्रुपचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांचीही ईडीच्या तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती.