नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने आयसीआयसीआय बँकेच्या माजी चेअरमन चंदा कोचर व इतरांची ७८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्त अंमलबजावणी संचालनालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस चंदा कोचर यांना पाठविली आहे. यामध्ये कोचर यांचे मुंबईमधील घर आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित मालमत्तेचा समावेश आहे.
ईडीकडून चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची मनी लाँड्रिग व आर्थिक अनियमिततेप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला १ हजार ८७५ कोटींचे कर्ज दिले होते. त्यामध्ये चंदा कोचर यांनी गैरप्रकार केल्याचा ईडीला संशय आहे. हे कर्ज व्हिडिओकॉन ग्रुपला २००९ आणि २०११ मध्ये देण्यात आले होते.