महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दिलासादायक वृत्त.. 'ही' कंपनी देणार ३० हजार हंगामी नोकऱ्या

रोजगाराचे प्रमाण ऑनलाईन डिलिव्हरीच्या व्यवसायात वाढले आहे. २ हजार ई-कॉमर्स कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीने ३० हजार हंगामी नोकऱ्या देण्याचे जाहीर केले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Sep 14, 2020, 8:12 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटात रोजगार कमी होत असताना दिलासादायक बातमी आहे. लॉजिस्टिक्स कंपनी ईकॉम एक्सप्रेसने ३० हजार हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे जाहीर केले आहे. हे कर्मचारी कंपनीच्या डिलिव्हरी सेंटरवर काम करू शकणार आहेत.

ईकॉम एक्सप्रेसच्या नोकऱ्या या अहमदाबाद, सुरत, विजयवाडा, चंदीगड, इंदूर, पाटणा, लखनौ, कानपूर, भोपाळ आणि जयपूर या ठिकाणी असणार आहेत. बहुतांश पदे हे डिलिव्हरी करणे, हबमध्ये वस्तुंची वर्गवारी करणे तसचे गोदामातील कामे करणे यासाठी भरण्यात येणार आहेत. कंपनीने २ हजार ई-कॉमर्स कंपन्यांबरोबर भागीदारी केल्याचा इकॉम एक्सप्रेसने दावा केला आहे. आगामी सणानिमित्त ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढणार आहे. यावेळी ग्राहकांडून घरपोच डिलिव्हरीला प्राधान्य देण्यात येणार आहे. इकॉम एक्सप्रेसचे कार्यकारी उपाध्यक्ष सौरभदीप सिंगला म्हणाले, की हंगामी कर्मचाऱ्यांमधून काही जणांना कायमस्वरुपी करण्यात येणार आहे.

हेही वाचा-टिकटॉकच्या खरेदीचा फिस्कटला सौदा; मायक्रोसॉफ्ट नव्हे 'ही' कंपनी आहे शर्यतीत

गेल्या काही वर्षात ३० टक्के लोकांना हंगामी कामासाठी नोकऱ्या दिल्या आहेत. त्यानंतर त्यामधील काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरी दिल्याची माहितीही सौरभदीप सिंगला यांनी दिली.

हेही वाचा-घाऊक बाजारपेठेतील महागाईत ऑगस्टमध्ये ०.१६ टक्क्याची वाढ

दरम्यान, कोरोनाच्या संकटात सगळ्याच क्षेत्रावर आर्थिक परिणाम झाला आहे. असे असले तरी ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details