नवी दिल्ली- काही ई-कॉमर्स कंपन्यांनी आज किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसाठी अंशत: कामकाज सुरू केले आहे. मात्र, ग्राहकांना डिलिव्हरी मिळण्याला उशीर लागेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
संचारबंदी लागू असल्याने लॉक डाऊनमध्ये पास मिळण्यासाठी काही आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांनी विविध जिल्हा प्रशासनांशी संपर्क साधला आहे. लॉकडाऊनमधून ई-कॉमर्स कंपन्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी पोलिसांनी ई-कॉमर्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अडविल्याचे प्रकार घडले आहेत. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दंडही ठोठावला आहे.