नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपन्यांना छोट्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत आहेत. त्यामुळे छोट्या शहरात विस्तार करण्यासाठी तेथे रोजगाराच्या संधी देण्यावर ई-कॉमर्स कंपन्या भर देत आहेत. अशा प्रकारे होणाऱ्या नोकर भरतीत १५ टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज आहे.
ई-कॉमर्स कंपन्या छोट्या शहरांमध्ये रोजगारांच्या देणार अधिक संधी, 'हे' आहे कारण
देशातील छोटी शहरे ही ई-कॉमर्सच्या प्रगतीमधील महत्त्वाचा हिस्सा ठरत आहेत. ऑनलाईन विक्रेतेही अधिकाधिक छोट्या शहरांना डोळ्यांसमोर ठेवून विक्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
देशातील छोटी शहरे ही ई-कॉमर्सच्या प्रगतीमधील महत्त्वाचा हिस्सा ठरत आहेत. ऑनलाईन विक्रेतेही अधिकाधिक छोट्या शहरांना डोळ्यांसमोर ठेवून विक्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मागणी वाढत असल्याने काही ई-कॉमर्स कंपन्यांनी छोट्या शहरांमध्ये गोदामे उभारली आहेत. तसेच त्या शहरांमधून नोकर भरतीही करत आहेत. ई-कॉमर्समुळे लॉजिस्टिक्स, ई-वॉलेट, एफसीजी आणि किरकोळ क्षेत्राची प्रगती होणार आहे. मेट्रो शहराच्या तुलनेत श्रेणी -२ व श्रेणी ३ शहरामध्ये ग्राहकांची संख्या वाढत आहे.
छोटी शहरे ही किरकोळ विक्रीमधील महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कारण तिथे स्वस्तामध्ये जमीन, कमी भाडे आणि ग्राहक हे नवीन प्रयोग स्विकारणारे असतात.