महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ड्रीम ११ च्या पालक कंपनीत विदेशी कंपन्यांकडून २,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक

ड्रीम्स स्पोर्ट्सकडे ड्रीम ११, फॅनकोड, ड्रीएमएक्स, ड्रीमसेटगो आणि ड्रीमपे या कंपन्यांची मालकी आहे. या ड्रीम्स स्पोर्ट्सने इंडियन स्पोर्ट्स टेक इकोसिस्टिममध्ये देशात पहिल्यांदाच मोठी गुंतवणूक मिळाल्याचे म्हटले आहे. ड्रीम ११ ने इंडियन प्रिमीयर लीग २०२० चे २२२ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. त्यामुळे ही कंपनी चर्चेत आली होती.

By

Published : Mar 24, 2021, 8:32 PM IST

Dream11
ड्रीम ११

नवी दिल्ली - स्पोर्ट तंत्रज्ञान आणि गेमिंग कंपनी ड्रीम स्पोर्ट्सने सुमारे २,९०४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्यात यश मिळविले आहे. ही गुंतवणूक खासगी संस्था टीसीव्ही, कॅपिटल पार्टनर आणि फाल्कन एजने केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ड्रीम्स स्पोर्ट्सकडे ड्रीम ११, फॅनकोड, ड्रीएमएक्स, ड्रीमसेटगो आणि ड्रीमपे या कंपन्यांची मालकी आहे. या ड्रीम्स स्पोर्ट्सने इंडियन स्पोर्ट्स टेक इकोसिस्टिममध्ये देशात पहिल्यांदाच मोठी गुंतवणूक मिळाल्याचे म्हटले आहे. ड्रीम ११ ने इंडियन प्रिमीयर लीग २०२० चे २२२ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. त्यामुळे ही कंपनी चर्चेत आली होती.

हेही वाचा-वाधवान पिता-पुत्रांचा आणखीन कारनामा उघडकीस; सीबीआयकडून गुन्हा दाखल

  • टीसीव्हीने पहिल्यांदाच भारतामध्ये गुंतवणूक केली आहे. यापूर्वी कंपनीने फेसबुक, एअरनब आणि गोडॅडीमध्ये गुंतवणूक केली होती.
  • गुंतवणूक फेरीमध्ये टायगर ग्लोबल, क्रीसकॅपिटल, टीपीजी ग्रोथ, स्ट्रीडव्हिव कॅपिटल आणि फुटपाथ व्हेंचर्स या कंपन्यांचाही समावेश होता.
  • ड्रीम स्पोर्ट्सचे सीईओ आणि सह-सहसंस्थापक हर्ष जैन म्हणाले की, भारतीय स्टार्ट-अप इकोसिस्टिमवर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखविण्यात आला आहे. आम्ही इंडियन स्पोर्ट्स इकोसिस्टिमचा विस्तार करण्यात व त्यामध्ये योगदान देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.
  • हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी ड्रीम स्पोर्ट्सची २००८ मध्ये स्थापना करण्यात आली होती. ड्रीम्स स्पोर्ट्स ही मुंबईस्थित कंपनी आहे. या कंपनीमध्ये सुमारे ६०० कर्मचारी कार्यरत आहेत.
  • कंपनीच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार २०१४ मधील १ लाख वापरकर्त्यांची संख्या वाढून २०२० मध्ये १० कोटी आहे.

हेही वाचा-एका बिटकॉईनवर खरेदी करता येणार टेस्ला; एलॉन मस्क यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details