नवी दिल्ली - खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. टाळेबंदी, टोळधाड आणि चक्रीवादळ अशी शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकटे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
सरकारची शेतकर्याबद्दल हीच वागणूक राहिली तर 2022पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे, हा एक दुसरा जुमला ठरणार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी मोदी सरकारवर केली आहे.