कोलोरॅडो- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत भेटीवर येण्यापूर्वी पुन्हा एकदा भारताच्या आयात शुल्काबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भारत आमच्यावर अनेक वर्षांपासून जादा आयात शुल्क लादत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ते कोलोरॅडोमधील कार्यक्रमात बोलत होते. असे असले तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत असल्याची त्यांनी भावना व्यक्त केली. मोठा व्यापार करार अस्तित्वात येईल, असेही त्यांनी सांगितले.
भारत व्यापारी धोरणाबाबत अमेरिकेला अयोग्य वागणूक देत असल्याची डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा तक्रार केली.ते म्हणाले, मी भारतात जाणार आहे. आम्ही व्यापाराबाबत कमी बोलणार आहोत. ते जगात सर्वाधिक आयात शुल्कापैकी शुल्क आम्हाला लागू करतात. पण, मी ऐकले आहे की, १ कोटी लोक जगातील सर्वात मोठ्या क्रीडांगणावर असणार आहेत. आम्ही बंदिस्त घरात असणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. हजारो लोकांना आत येणार नाही. गर्दी असल्याचे मला वाईट वाटत नाही. जर १ कोटी लोक असतील तर ते ६० हजार जणांच्या स्टेडियममध्ये कसे बसणार आहेत, असा त्यांनी प्रश्नही उपस्थित केला.