नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात देशभरातील हजारो मजूर शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत आहेत. अशा परिस्थितीत राज्यांनी धान्य व डाळीचा गोडावूनमधून उचलण्याचे आवाहन केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी राज्यांना केले आहे.
येत्या पंधरा दिवसात रेशनकार्ड नसलेल्या ८ कोटी मजुरांना धान्य पुरवावे, अशी पासवान यांनी राज्यांना सूचना केली आहे. जर ८ कोटीहून अधिक मजूर असतील तर केंद्र सरकार अतिरिक्त मोफत धान्य पुरवेल, असे रामविलास पासवान यांनी व्हिडिओद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत असलेल्या ८१ कोटी लाभार्थीपैकी १० टक्के लाभार्थी स्थलांतरित हे गृहीत धरून धान्यसाठ्याची तजवीज करण्यात येत असल्याचे पासवान यांनी सांगितले.
हेही वाचा-कोरोनाचे संकट : १३.५ कोटी नोकऱ्यांवर संक्रात; १२ कोटी जण गरिबीत ढकलले जाणार