नवी दिल्ली- मिठाईच्या दुकानांमधील गोड पदार्थांची विक्री करताना विक्रेत्यांना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. मिठाई विक्रेत्यांना खुली मिठाई कधी तयार केली आहे व किती दिवसापर्यंत खाण्यास योग्य आहे, याची माहिती दर्शवावी लागणार आहे. हा एफएसएसएआयचा निर्णय १ जून, २०२० पासून लागू होणार आहे.
सध्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमानुसार केवळ पॅकिंग केलेल्या मिठाईसाठी नियम आहेत. मुदत संपलेली खुली मिठाई खाल्ल्याने ग्राहकांच्या आरोग्याला अपाय होत असल्याचे काही अहवालामधून समोर आले आहे. त्यामुळे एफएसएसएआयने नवे निर्देश जारी केले आहेत.