महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

डिझेल प्रतिलिटर ५ पैशांनी स्वस्त; पेट्रोलचे दर सहाव्या दिवशी स्थिर

डिझेलच्या किमती सलग पाचव्या दिवशी कमी झाल्या आहेत. तर सरकारी कंपन्यांनी पेट्रोलच्या किमती सलग सहाव्या दिवशी स्थिर ठेवल्या आहेत.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Sep 29, 2020, 6:47 PM IST

नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिले आहेत. त्याचा परिणाम म्हणून डिझेलच्या किमती देशात आणखी उतरल्या आहेत. महानगरांमध्ये किरकोळ विक्रीतील डिझेलचे दर ५ पैशांनी कमी झाले आहेत.

दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर हा ८ पैशांनी कमी होऊन ७०.६३ रुपये आहे. यापूर्वी डिझेलची किंमत सोमवारी ७०.६२ रुपये होती. याचप्रमाणे इतर महानगरांमध्ये डिझेलचे दर कमी झाले आहेत. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ७७.०४ रुपये, चेन्नईत ७६.१० रुपये, कोलकात्यात ७४.१५ रुपये आहे. डिझेलच्या किमती सलग पाचव्या दिवशी कमी झाल्या आहेत. तर सरकारी कंपन्यांनी पेट्रोलच्या किमती सलग सहाव्या दिवशी स्थिर ठेवल्या आहेत.

हेही वाचा-मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय

दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८१.०६ रुपये, मुंबईत ८७.७४ रुपये, चेन्नईत ८४.१४ रुपये आणि कोलकात्यात ८२.५९ रुपये आहे. कोरोना महामारीमुळे जगभरात कच्च्या तेलाची मागणी कमी होणार आहे. या भीतीमुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. कच्च्या तेलाची किंमत घसरून प्रति बॅरल ४२ डॉलर झाला आहे. दर कमी झाल्याने महिनाभरात दिल्लीत डिझेल हे प्रति लिटर २.९३ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

हेही वाचा-जागतिक पर्यटन दिन २०२०: भविष्याबाबत पुनर्विचार करण्याची संधी

ABOUT THE AUTHOR

...view details