मुंबई- खासगीकरण करूनही मुंबई विमानतळावरील अपुऱ्या सुविधांचा प्रश्न कायम आहे. तिथे पुरेशा सुविधा नसल्याने ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याच्या महत्त्वाकांक्षेवर परिणाम होईल, असा इशारा लॉजिस्टिक्स कंपनी डीएचएल एक्सप्रेसने दिला आहे.
डीएचएल एक्सप्रेसकडून आयात-निर्यातीसाठी ग्राहकांना सेवा देण्यात येते. त्यासाठी एअर फ्राईट ऑपरेटर म्हणून सेवा देताना विमानतळावर केवळ एकच स्लॉट असल्याचे डीएचएफएल कंपनीने म्हटले आहे.
देशातील सर्वात मोठे विमानतळ असताना तिथे विस्तारण्याचा पर्याय नाही. ग्राहकांकरिता नेटवर्क विस्तारण्यासाठी कमी असलेल्या स्लॉटमुळे बंधन येत असल्याचे डीएचएल एक्सप्रेसचे जागतिक प्रमुख जॉन पिअरसन यांनी सांगितले. देशातील बहुतांश विमानतळामध्ये ऑपरेटरांसाठी पुरेशा जागा असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सुब्रमणियन यांनी सांगितले.