नवी दिल्ली- टोळधाडीने देशातील काही राज्यांमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमान सेवेकरिता सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
टोळधाड हे सामान्यत: कमी उंचीवर आढळून येतात. त्यामुळे विमान उड्डाण करताना व विमान उतरताना धोका असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. विमान उड्डाण करताना टोळधाड आढळल्यास संबंधित वैमानिकानेत्याची माहिती देण्याची गरज आहे. अशा टोळधाडीमधून विमान नेण्याचे टाळावे, असा आग्रही सल्ला डीजीसीएने विमान कंपन्यांना दिला आहे.