नवी दिल्ली- कोरोनाची तिसरी लाट धडकणार असल्याची भीती व्यक्त होत असताना आंतरराष्ट्रीय विमान सेवांवर पुन्हा मर्यादा घालण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३१ जुलै २०२१ पर्यंत पुन्हा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
डीजीसीएने २८ मे २०२१ रोजी परिपत्रक काढून आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३० जून २०२१ पर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत आज संपत असताना पुन्हा परिपत्रक काढून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध एक महिन्यांनी पुन्हा वाढविण्यात आले आहेत.
हेही वाचा-१० दिवसांतच अभिनेता दिलीप कुमार पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल!
परिपत्रकात काय म्हटले आहे?
जरी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू झाले असले तरी आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीवर निर्बंध लागू होणार नाहीत. निवडक मार्गांवर यंत्रणेने परवानगी दिली तर नियोजीत आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा सुरू राहिल, असे डीजीसीएने परिपत्रकात म्हटले आहे. यापूर्वीच्या परिपत्रकातही डीजीसीएने असेच नमूद केले होते.
हेही वाचा-ऐकावं ते नवलंच! गुजरातच्या पोलीस ठाण्यात 2 भूतांविरोधात गुन्हा दाखल
विशेष विमान सेवांना मिळणार परवानगी-
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाबाधितांचे प्रमाण रोज कमी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा मार्च २०२० पासून बंद आहे. असे असले तरी वंदे भारत मिशनसारख्या विशेष आंतरराष्ट्रीय विमान सेवा मे २०२० पासून सुरू आहेत. भारताने २६ देशांबरोबर एअर बबलच्या माध्यमातून विमान सेवा जुलै २०२० पासून सुरू केली आहे. यामध्ये अमेरिका, संयुक्तर अरब अमिराती, भुतान आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे.