महाराष्ट्र

maharashtra

डिजीटल मीडियाने खासगी शिक्षकांना 'अच्छे दिन''; नोकऱ्यांच्या संख्येत ४० टक्के वाढ

By

Published : Sep 4, 2019, 5:32 PM IST

डिजीटल मीडियामुळे ई-शिक्षकांची मागणी वाढली आहे. जुलै २०१६ ते जुलै २०१९ मध्ये शिक्षकांच्या नोकऱ्या शोधण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ई-लर्निंगमुळे ऑनलाईन शिक्षकांची मागणी वाढल्याचे इंडिड या नोकऱ्या देणाऱ्या संकेतस्थळाने म्हटले आहे.

प्रतिकात्मक

बंगळुरू - खासगी शिक्षकांच्या नोकऱ्यांची संख्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये वाढली आहे. हे प्रमाण २०१८-१९ च्या तुलनेत ४० टक्के अधिक झाल्याचे एका नोकरीविषयक संकेतस्थळाने म्हटले आहे.

डिजीटल मीडियामुळे शिक्षकांची मागणी वाढली आहे. जुलै २०१६ ते जुलै २०१९ मध्ये शिक्षकांच्या नोकऱ्या शोधण्याचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ई-लर्निंगमुळे ऑनलाईन शिक्षकांची मागणी वाढल्याचे 'इंडिड' या नोकऱ्या देणाऱ्या संकेतस्थळाने म्हटले आहे.

हेही वाचा- मारुतीचे हरियाणाच्या प्रकल्पामधील २ दोन दिवस उत्पादन राहणार बंद

खासगी शिक्षकांचे वाढले पगार -

खासगी शिक्षकांना सरासरी वार्षिक वेतन २ लाख १९ हजार ८०४ रुपये आहे. हे वेतन वाढून ५ लाख ८८ हजार रुपये झाले आहे. तर ऑनलाईन शिक्षकांचा पगार हा ४ लाख ८० हजार रुपये होता. तर हे प्रमाण वाढून ९ लाख २५ हजार रुपये झाले आहे. ही माहिती विविध उमेदवारांनी दिलेल्या माहितीवरून आणि इंडिड या जॉब पोर्टलमधील जाहिरातीवरून घेण्यात आली. यामध्ये गेल्या ३६ महिन्यांची आकडेवारी विचारात घेण्यात आली आहे.

हेही वाचा-डॉलरपुढे रुपयाची घसरगुंडी; गेल्या ९ महिन्यातील गाठला तळ

ABOUT THE AUTHOR

...view details