महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' शहरातील मेट्रोत मिळणार मोफत वायफाय सुविधा

डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह यांनी शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनवर वायफाय सुविधा लाँच केली.

By

Published : Jan 2, 2020, 3:42 PM IST

Metro railway
मेट्रो रेल्वे

नवी दिल्ली - दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने (डीएमआरसी) सर्व सहा मेट्रो स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा सुरू केली आहे. ही सर्व मेट्रो स्टेशन सुविधा एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर आहेत. या मार्गावरून मेट्रोतून जाणाऱ्या प्रवाशांना मोफत वायफायचा वापर करता येणार आहे.


देशात पहिल्यांदाच धावत्या रेल्वेत प्रवाशांना वायफाय देण्यात आल्याचे डीएमआरसीने ट्विट केले आहे. यापूर्वी दिल्ली मेट्रोकडून बहुतांश मेट्रो स्थानकावर मोफत वायफायची सुविधा देण्यात येत आहे. डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह यांनी शिवाजी स्टेडियम मेट्रो स्थानकावर वायफाय सुविधा लाँच केली.

हेही वाचा-उत्पादन क्षेत्रात डिसेंबरमध्ये सुधारणा; 'व्यवसाय विश्वासा'चा तीन वर्षातील निचांक

या सुविधेला 'ओयूआय डीएमआरसी फ्री वायफाय' असे नाव देण्यात आलेले आहे. हे नाव टाकून प्रवाशांनी लॉग इन करताच सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ही सुविधा हळूहळू सर्व मेट्रो स्थानकात देण्याचे डीएमआरसीचे उद्दिष्ट आहे. प्रवाशांना वायफायमुळे सर्वसाधारण इंटरनेट अॅप्लिकशनचाही वापर करता येणार आहे.

हेही वाचा-ट्रायची प्रेक्षकांना नववर्षाची भेट : कमी पैशात दिसणार जादा प्रसारण वाहिन्या

ABOUT THE AUTHOR

...view details