नवी दिल्ली -दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची जामीन याचिका आणखी एकदा फेटाळली आहे. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. यानंतर विशेष न्यायालयाने त्यांची रवानगी तिहार तुरुंगात केली होती.
माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना सध्या तीन ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने २१ ऑगस्टला त्यांना जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली होती. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणात जामीनाची मागणी केली होती.