नवी दिल्ली - रस्ते प्रकल्पांना उशीर हा अस्वीकारार्ह असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. विकसक आणि अधिकाऱ्यांनी वेळेवर प्रकल्प करावेत, अशी गडकरींनी सूचना केली.
रस्ते प्रकल्प वेळेवर पूर्ण करा, नितीन गडकरींची विकसकांसह अधिकाऱ्यांना सूचना - प्रगती
पंतप्रधान कार्यालयाकडून विविध प्रकल्पावर देखरेख करणाऱ्या गती आणि प्रगती या वेबसाईटचे नितीन गडकरींनी कार्यक्रमात लाँचिंग केले.
पंतप्रधान कार्यालयाकडून विविध प्रकल्पांवर देखरेख करणाऱ्या गती आणि प्रगती या वेबसाईटचे नितीन गडकरींनी कार्यक्रमात लाँचिंग केले. गडकरींना ३ लाख कोटी रुपयांच्या ५०० रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला.
गडकरींनी दक्षिण आणि केंद्रीय झोनमधील प्रकल्पांचा आढावा घेतला. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, पाँडेचरी, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांतील प्रकल्पांचा समावेश आहे. गडकरी हे स्वत: प्रकल्पावर देखरेख करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर