नवी दिल्ली- भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (आयसीएमआर) चीनमधून आयात केलेल्या कोरोनाच्या टेस्ट किट परत करण्याच्या निर्णयावर चीनने अत्यंत चिंता व्यक्त केली आहे. हा प्रश्न भारत योग्य पद्धतीने सोडवेल, अशी आशा चीनने व्यक्त केली आहे.
आयसीएमआरने चीनमधून आयात केल्या टेस्ट किटचा वापर राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या टेस्ट किट या चिनी कंपनी गुआनझहोवू वॉन्डफो बायोटेक आणि झुआई लिव्हझॉन डायनोग्स्टिक्स यांच्याकडून आयात करण्यात आल्या होत्या. पण त्यांच्या टेस्ट किटचे परिणाम हे चुकीचे येत असल्याचे दिसून आले आहे.
आयसीएमआरच्या परिणामाच्या मूल्यांकनाबाबत खूप चिंतेत असल्याची प्रतिक्रिया चीनच्या राजदूत कार्यालयाचे प्रवक्ते जी राँग यांनी दिली आहे. चीनने दर्जेदार आणि अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय साधने भारताला केल्याचा त्यांनी दावा केला. काही वैयक्तिक लोकांच्या अयोग्य आणि बेजाबदारपणामुळे चीनची उत्पादने ही सदोष म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली.