दावोस - जगभरातील विविध देशांचे नेते जागतिक आर्थिक मंचाच्या ५० व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिनिव्हास्थित संस्थेचे संस्थापक क्लावूस श्वाब यांनी २०५० किंवा त्यापूर्वी शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक क्लावूस श्वाब यांनी सर्व सदस्य देशांना व भागीदारांना रविवारी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी दृढसंबंध आणि शाश्वत जगासाठी ठोस सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे.
जागतिक आर्थिक मंचाच्या बैठीकाला सुमारे ३ हजारांहून अधिक जागतिक नेते, कंपन्यांचे सीईओ, राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीचे पंतप्रधान अँजेला मर्केल यादेखील मंचाच्या वार्षिक बैठकीत उपस्थित राहणार आहेत. 'दृढसंबंध आणि शाश्वत जगासाठी भागीदार' ही जागतिक आर्थिक मंचाच्या ५० व्या वार्षिक परिषदेची संकल्पना आहे.