नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यातील करदात्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलासा दिला आहे. प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरण्याची मुदत ३१ जानेवारी, २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही मुदत केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरसह लडाखसाठी लागू असणार आहे.
आयटीआर भरण्याला जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये मुदतवाढ - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ
केंद्र सरकारने ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्राप्तिकरदात्यांना ऑनलाईन आयटीआर भरण्यात अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा विस्कळित आहे. सीबीडीटीला प्राप्तिक परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे अधिकार आहे. त्या अधिकारांतर्गत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राप्तिकर कायदा ११९ अंतर्गत हे अध्यादेश काढण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्राप्तिकरदात्यांना ऑनलाईन आयटीआर भरण्यात अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
हेही वाचा-मागोवा २०१९ - सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या व्यापार क्षेत्रातील दहा घडामोडी