नवी दिल्ली - केंद्र सरकारने दिवाळीच्या आधीच लाखो कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा १२ टक्क्यावरून १७ टक्के करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा माहिती देताना प्रकाश जावडेकर यांनी वाढीव महागाई भत्त्याचा सुमारे ६२ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार असल्याचे सांगितले.