महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एमएलएम मार्केटिंगमधून ५ हजार कोटींची फसवणूक, बाप-लेकाला सायबराबाद पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Enforcement Directorate

नोएडा येथील मल्टीलेवल मार्केटिंग कंपनी ई-बिझने फसवणूक केल्याची तक्रार एका नागरिकाने केली होती. या प्रकरणी सायराबाद पोलिसांनी आरोपींना सोमवारी दिल्लीत जाऊन अटक केली.

प्रतिकात्मक

By

Published : Aug 20, 2019, 8:11 PM IST

हैदराबाद - साखळी पद्धतीने मार्केटिंग करणाऱ्या ई-बिझच्या मालकाने लोकांची ५ हजार कोटींची फसवणूक केली आहे. या आरोपीसह त्याच्या मुलाला सायराबाद पोलिसांनी गजाआड केले आहे. पवन मल्हान आणि त्याचा मुलगा हितिख मल्हान अशी आरोपींची नावे आहेत.


नोएडा येथील मल्टीलेवल मार्केटिंग कंपनी ई-बिझने फसवणूक केल्याची तक्रार एका नागरिकाने केली होती. या प्रकरणी सायराबाद पोलिसांनी आरोपींना सोमवारी दिल्लीत जाऊन अटक केली. त्यानंतर मंगळवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. कंपनीने पिरॅमिड पद्धतीने व्यवसायाची रचना केली होती. यामध्ये सुरुवातीला सभासद होणाऱ्यांना पैसे मिळत होते. जितके जास्त सभासद जोडले जातील, त्या पद्धतीने पैसे वाढ होते.

ई-बिझ डॉट कॉम कंपनीच्या खात्यावरील ३८९ कोटी रुपये गोठविण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये आहे. यापूर्वी सक्त वसुली संचालनालयानेही ई-बिझ कंपनी विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details