नवी दिल्ली - बँकांमधील घोटाळ्यांचे प्रकारामध्ये वरचेवर वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाने स्वतंत्र सल्लागार मंडळाची स्थापना (एबीबीएफ) केली आहे. या मंडळाचे अध्यक्षपद माजी केंद्रीय दक्षता आयुक्त टी.एम.भसिन यांच्याकडे असणार आहे.
स्वतंत्र सल्लागार मंडळ (एबीबीएफ)हे ५० कोटींहून अधिक रकमेच्या बँक घोटाळ्याची चौकशी करणार आहे. यापूर्वी सीव्हीसीने बँक, व्यापार आणि वित्तीय घोटाळ्यांची चौकशी करणारे सल्लागार मंडळ स्थापन केले होते. एबीबीएफची स्थापना आरबीआयशी चर्चा करून करण्यात आली आहे. या मंडळाकडे बँकेतील घोटाळे प्रकरणाची पहिल्या टप्प्यातील चौकशी केली जाणार आहे.