महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानात गर्दी; धनत्रयोदशीला मात्र सराफा बाजाराकडे पाठ - धनत्रयोदशी सोने खरेदी

दिवाळीच्या खरेदीसाठी दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन विकून हातात रोकड जमा होते.  यावर्षी सोयाबीन जरी आले असले तरी मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन वाया गेले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

संग्रहित - सोने खरेदी

By

Published : Oct 25, 2019, 7:46 PM IST

Updated : Oct 25, 2019, 8:06 PM IST

जालना - विधानसभा निवडणुकीनंतर आज चाकरमाने आणि कार्यकर्ते दिवाळीच्या खरेदीला लागले आहेत. कपडे व किराणा या दुकानांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र, धनत्रयोदशीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे सराफा बाजारातील दुकानांमध्ये होणारी नागरिकांची गर्दी यंदा दिसत नाही.

शहरातील सराफा बाजारात आज दोन किलो सोन्याची उलाढाल होण्याची शक्यता आहे. ही सर्व उलाढाल शहरी भागातील आणि नोकरदार वर्गाच्या खरेदीमुळे होणार आहे. सराफा बाजारावर मंदीचेदेखील सावट आहे. ग्रामीण भागातील जनतेने सोन्याच्या वाढलेल्या प्रचंड भावामुळे या बाजाराकडे पाठ फिरविली आहे.

हेही वाचा-धनत्रयोदशीनिमित्त ग्राहकांची मागणी वाढल्याने सोने प्रति तोळा 220 रुपयांनी महाग


दिवाळीच्या खरेदीसाठी दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन विकून हातात रोकड जमा होते. यावर्षी सोयाबीन जरी आले असले तरी मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन वाया गेले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यातच 22 कॅरेट सोन्याचे भाव ४ हजार रुपये प्रति ग्रामपर्यंत पोहोचले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 5 हजार रुपये ग्रामपर्यंत पोहोचले आहेत. चांदीदेखील चार हजार 900 रुपये प्रति भाव घेऊन चकाकली आहे.

ग्राहकांची दुकानात गर्दी;सराफा बाजाराकडे पाठ

एकंदरीत बाजारामध्ये नागरिकांची तुफान गर्दी आहे. मात्र सराफा बाजारात ग्राहकांचा खरेदीसाठी अल्पसा प्रतिसाद आहे. अवकाळी पावसामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळित झाले आहे. विधानसभा निवडणूकीनंतर आज चाकरमाने आणि कार्यकर्ते दिवाळीच्या खरेदीला लागले आहेत. कपडे व किराणा या दुकानांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र, धनत्रयोदशीनिमित्ताने दरवर्षीप्रमाणे सराफा बाजारातील दुकानांमध्ये होणारी नागरिकांची गर्दी यंदा दिसत नाही.

शहरातील सराफा बाजारात आज दोन किलो सोन्याची उलाढाल होण्याची शक्यता आहे. ही सर्व उलाढाल शहरी भागातील आणि नोकरदार वर्गाच्या खरेदीमुळे होणार आहे. सराफा बाजारावर मंदीचेदेखील सावट आहे. ग्रामीण भागातील जनतेने सोन्याच्या वाढलेल्या प्रचंड भावामुळे या बाजाराकडे पाठ फिरविली आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी दरवर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन विकून हातात रोकड जमा होते. यावर्षी सोयाबीन जरी आले असले तरी मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन वाया गेले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यातच 22 कॅरेट सोन्याचे भाव ४ हजार रुपये प्रति ग्रामपर्यंत पोहोचले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 5 हजार रुपये ग्रामपर्यंत पोहोचले आहेत. चांदीदेखील 4 हजार 900 रुपये प्रति दरापर्यंत पोहोचून चकाकली आहे.

एकंदरीत बाजारामध्ये नागरिकांची तुफान गर्दी आहे. मात्र सराफा बाजारात ग्राहकांचा खरेदीसाठी अल्पसा प्रतिसाद आहे. अवकाळी पावसामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन विस्कळित झाले आहे.

Last Updated : Oct 25, 2019, 8:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details