नवी दिल्ली- कोरोनाच्या चाचणीचा खर्च व त्याच्या निदानासाठी लागणारा वेळ हा गुंतागुंतीचा प्रश्न सुटणार आहे. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदने (सीएसआयआर) रिलायन्सबरोबर कोविड-१० आरटी लॅम्प या किटच्या उत्पादनासाठी सामंजस्य करार केला आहे. यामधून केवळ २०० रुपयांत कोरोना चाचणी करता येते, तर कोरोना चाचणीचा अहवाल एका तासात मिळू शकतो.
कोविड-१० आरटी लॅम्प, असे या किटचे नाव आहे. यामध्ये न्यूक्लिक अॅसिडवर आधारित नाक अथवा घशामधील स्त्रावाची चाचणी घेतली जाते. याबाबतच्या सीएसआयआरने घेतलेल्या चाचण्या यशस्वी झालेल्या आहेत. याबाबत बोलताना सीएसआयआरचे संचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले, की आरटी-लॅम्प ही चाचणी स्वस्त आहे. कारण त्यासाठी तुम्हाला साधनांची गरज नाही. ती चाचणी लवकर होते. ही चाचणी तुम्ही ग्रामीण भागातही घेवू शकणार आहे.
हेही वाचा- ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नव्हे 'जाळे'; टाळेबंदीतही ग्राहकांची होतेय फसवणूक