कोलकाता - कर्जाची मागणी घटल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. अशा स्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. रजनीश कुमार हे बँकांच्या विविध शाखांशी चर्चा करण्यासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले.
अर्थव्यवस्थेतील कर्जाची मागणी कमी झाली आहे. सरकारी बँकांकडून पुरेसा पतपुरवठा होऊ शकत नाही. तसेच त्यांच्याकडे पुरेसे भांडवलही नाही. चांगला मान्सून झाल्यास सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी व्यक्त केला. सरकारकडून होणारा खर्च वाढल्याने आणि येणारे सण यामुळे मागणी वाढेल, असेही ते म्हणाले.