मुंबई- कोरोना महामारीत नोकऱ्या गमाविण्याचे वाढलेले प्रमाण आणि वेतन कपातीचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी मासिक हप्त्यात वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण हे कोरोना महामारीत वाढले आहे. क्रेडिट कार्डवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या एकूण मासिक हप्त्याचे आजपर्यंतचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.
एचडीएफसी बँकेचे प्रमुख (क्रेडिट कार्ड) अंशुमन चटर्जी म्हणाले, की क्रेडिट कार्डमधून खरेदीचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना सवलतीत खरेदी करणे शक्य होण्यासाठी एचडीएफसी बँकेने विविध उत्पादकांशी करार केला आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेत पैसे भरणे शक्य होते. ग्राहक मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करत आहेत. त्यामुळे मागणी वाढण्यासाठी मदत होत असल्याचे चटर्जी यांनी बँक कर्मचाऱ्यांना दिलेल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
हेही वाचा-सिल्व्हर लेक जिओपाठोपाठ 'रिलायन्स रिटेल'मध्ये करणार ७,५०० कोटींची गुंतवणूक