महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' संघटनेकडून पुलवामा येथील हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना मिळाले ९ फ्लॅट

क्रेडाईने फेब्रुवारी २०१९ ला जवानांच्या कुटुंबांना दोन बेडरुमचे फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाप्रमाणे क्रेडाईने दिल्ली-एनसीआरमध्ये  जवानांच्या कुटुंबांना फ्लॅटचे कागदपत्रे हस्तांतरित केली आहेत.

CREDAI
सौजन्य - क्रेडाई

By

Published : Jan 17, 2020, 6:22 PM IST

नवी दिल्ली - क्रेडाई ही पुलवामा येथील हल्ल्यात वीरमरण आलेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पुढे आली आहे. क्रेडाईने हुतात्मा झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या कुटुंबांना ९ फ्लॅटचे कागदपत्रे एका कार्यक्रमात दिले आहेत.

क्रेडाईने फेब्रुवारी २०१९ ला जवानांच्या कुटुंबांना दोन बेडरुमचे फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाप्रमाणे क्रेडाईने दिल्ली-एनसीआरमध्ये जवानांच्या कुटुंबांना फ्लॅटचा कागदपत्रे हस्तांतरित केली आहेत. यावेळी सीआरपीएफचे जवान, आयपीएस अधिकारी आणि फ्लॅट देणारे बांधकाम विकासक उपस्थित होते. यापूर्वी १० फ्लॅट्स पश्चिम बंगाल, राजस्थान, तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये देण्यात आल्याचेही क्रेडाईने म्हटले आहे. क्रेडाईने ४० फ्लॅट्स देण्याचे आश्वासन दिले होते.

हेही वाचा-'टीसीएस'च्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीत अंशत: वाढ

देशप्रेमाची प्रेरणा आणि कुटुंबाने केलेला त्याग लक्षात घेवून आम्ही पुढे येण्याचा निर्णय घेतला. आश्वासन दिल्याप्रमाणे दिल्ली-एनसीआरमध्ये ९ फ्लॅट देताना आनंद होत असल्याचे क्रेडाईचे माजी अध्यक्ष गीतांबर आनंद यांनी म्हटले. क्रेडाई ही स्थावर मालमत्ता व्यावसायिकांची शिखर संघटना आहे. या संघटनेचे देशात १२,००० सदस्य आहेत.

हेही वाचा-देशातील अ‌ॅमेझॉन प्राईममध्ये दुप्पट गुंतवणूक करणार - जेफ बेझोस

ABOUT THE AUTHOR

...view details