महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 22, 2021, 3:49 PM IST

ETV Bharat / business

कोरोनाची दुसरी लाट; बँकिंग कर्मचाऱ्यांच्या वेळेत कपात करा, इंडियन बँक असोसिएशनची मागणी

इंडियन्स बँक असोसिएशनचे चेअरमन राजकिरण राय जी. म्हणाले, की बँकामधील काउंटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. रोज बँक कर्मचाऱ्यांना होणारे संसर्ग आणि त्यांच्या मृत्यूचे वृत्त मिळाल्यानंतर आम्हाला खूप चिंता वाटत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया

नवी दिल्ली- कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मृत्युंचे प्रमाण वाढल्याने बँकिंग संघटनेनेही धसका घेतला आहे. बँकांचे कामकाज कमी करून रोज तीन तासापर्यंत करावे, अशी मागणी इंडियन्स बँक असोसिएशनने सरकारकडे केली आहे.

इंडियन्स बँक असोसिएशनचे चेअरमन राजकिरण राय जी. म्हणाले, की बँकामधील काउंटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. रोज बँक कर्मचाऱ्यांना होणारे संसर्ग आणि त्यांच्या मृत्यूचे वृत्त मिळाल्यानंतर आम्हाला खूप चिंता वाटत आहे. अशा परिस्थितीत सर्व बँकिंग समुदायाने तातडीने प्रश्न सोडवावा. महत्त्वाच्या बँकिंग सेवा फक्त सुरू ठेवाव्यात. दिवसभरात बँकिंगचे 3 ते 4 तास करावेत, अशी संघटनेची मागणी आहे. या उपाययोजना केल्या तर संसर्गाची साखळी तुटण्यासाठी मदत होईल, असा विश्वास आहे. रुग्णालयांमध्ये बेड, पायाभूत सुविधा, महत्त्वाची औषधे आणि ऑक्सिजन नसल्याची आम्हाला सातत्याने माहिती मिळत आहे. या परिस्थितीत देशभरात चिंता वाढत आहे.

हेही वाचा-धक्कादायक! पत्नी मदतीसाठी टाहो फोडत राहिली; कोरोना रुग्णाने हॉस्पिटलच्या दारातच सोडले प्राण

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनेही कर्मचारी वेळेत कपात करण्याची मागणी-

दरम्यान, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनेही (युएफबीयू) कर्मचाऱ्यांच्या वेळेत कपात करण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे केली आहे. ही संघटना नऊ बँक संघटनांची शिखर संस्था आहे. तसेच इंडियन्स बँक असोसिएशनची युएफबीयू ही प्रतिनिधीत्व करते.

हेही वाचा-"गुडमॉर्निंग, कदाचित ही अखेरची शुभसकाळ असेल,'' डॉ मनीषा जाधव यांची अखेरची पोस्ट

हेही वाचा-राज्यात 67 हजार 468 नवे कोरोनाग्रस्त, 568 जणांचा मृत्यू

चोवीस तासांत राज्यात 67 हजार 468 नव्या कोरोनाबाधितांची नोंद -

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. राज्यात 15 दिवसांचे निर्बंध लागू केले असूनही होणारी रुग्णवाढ महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 67 हजार 468 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. 568 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या 1.54 टक्के एवढा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details