महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबईमधील हिरे व्यवसायावर कोरोनाची पडछाया; 250 व्यापाऱ्यांनी सुरतमध्ये हलविली दुकाने

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील हिरे व्यापार संकटात सापडला आहे. व्यापाऱ्यांनी गुजरातमध्ये दुकाने हलविण्या सुरुवात केली आहे.

संग्रहित - हिरे व्यावसायिक
संग्रहित - हिरे व्यावसायिक

By

Published : Sep 29, 2020, 4:16 PM IST

Updated : Sep 29, 2020, 5:26 PM IST

अहमदाबाद (गुजरात)- कोरोना महामारीत व्यवसाय ठप्प होत असताना मुंबईमधील हिरे व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या हिरे व्यापाऱ्यांनी व्यवसाय भविष्यातील संधीसाठी सुरतमध्ये हलविण्यास सुरुवात केली आहे.

सुरतमधील महत्त्वाकांक्षी बाजार प्रकल्प हा निर्माणाधीन आहे. या प्रकल्पाकडे मुंबईमधील व्यापारी आकर्षित होत आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबईमधील हिरे व्यापाऱ्यांनी १५० दुकाने बुर्स प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे देशातील १० पैकी ९ हिऱ्यांवर गुजरातमध्ये प्रक्रिया केली जाते. सुरत हे हिरे कटिंग आणि पॉलिशिंगचे मुख्य केंद्र आजवर राहिले आहे. तर हिरे निर्यात, मुख्य व्यवहार आणि व्यापारासाठी मुंबई हे केंद्र राहिले आहे.

सुरतमधील अनेक हिरे पॉलिश कंपन्यांचे मुंबईमधील हिरे बाजारपेठेमध्ये कॉर्पोरेट कार्यालये आहेत. असे असले तरी कोरोना महामारीने अनेक कंपन्यांना मुंबईमधील कार्यालये बंद करावी लागली आहे. जरी गुजरातमधील बाजार प्रकल्पाचे काम सुरू असले तरी मुंबईमधील अनेक हिरे व्यापारी सुरतमध्ये परतत आहेत.

250 व्यापाऱ्यांनी सुरतमध्ये हलविली दुकाने

हेही वाचा-मुकेश अंबानी सलग नवव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय

ईटीव्ही भारतशी बोलताना जेजीईपीसीचे चेअरमन दिनेश नवाडिया म्हणाले, की मुंबईहून २५० हून अधिक कंपन्यांनी सुरतमध्ये व्यवसाय हलविले आहेत. अनेक व्यापारी यापूर्वीच त्यांच्या कुटुंबासमवेत सुरतमध्ये स्थायिक झाले आहेत. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहे. सुरतमध्ये घर, व्यापार असल्याने मुंबईहून व्यापारी गुजरातमध्ये परतत आहेत. सुरत डायमंड बुर्स सुरू होणार असल्याने बहुतांश व्यापारी सुरतमध्ये परतणार आहेत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. सुरत हे सर्वात मोठे ट्रेडिंग हब होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. विदेशातील ग्राहक येथे येतील, असेही त्यांनी सांगितले.

हिरे व्यापारी किर्ती शाह यांचे मत वेगळे आहे. ते म्हणाले, की यापुढेही मुंबईच हे हिरे व्यापाराचे केंद्र राहणार आहे. जगभरातील खरेदीदार हिरे खरेदीसाठी मुंबईतच येणार आहेत. कारण, तिथे पायाभूत सुविधा आहेत. मुंबईमधून हिरे व्यापार गुजरातमध्ये पूर्ण जाईल, असे वाटत नाही. मुंबई हे शेवटी मुंबई आहे.

हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात ५९३ अंशांनी तेजी; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर

सुरतची हिरे बाजारपेठेचे काम हे २०२२ला पूर्ण होणे अपेक्षित आहे. मुंबईमधील ६० टक्क्यांहून अधिक हिरे व्यापार सुरतमध्ये हलविण्याता आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरतमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्राला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मात्र हिरे व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या करावर पाणी सोडावे लागणार आहे.

Last Updated : Sep 29, 2020, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details