नवी दिल्ली- महामारी कोरोनाने गेल्या पंधरा दिवस देशातील उद्योगांवर परिणाम झाला आहे. तर लोकांना घराबाहेर फिरण्यावर निर्बंध आले आहेत. त्याचा जागतिक आर्थिक चलनवलनावर कायमस्वरुपी वर्षभर परिणाम होणार असल्याचा इशारा मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिसने इशारा दिला आहे.
कोरोनाने जागतिक अर्थव्यस्थेच्या वृद्धिदरात कमालीची घसरण झाली आहे. तर येत्या काही महिन्यांत अर्थव्यवस्थेत अनिश्चितता राहणार आहे. त्यावर मात करण्यासाठी उद्योग आणि कुटुंब कसे प्रयत्न करतात, यावर कोरोनाचा परिणाम अवलंबून राहणार आहे. तसेच कोरोनाचा प्रसार किती काळ राहणार आहे, त्यावर अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अवलंबून असणार आहे. कोरोनाचा परिणाम होत असला तरी धोरणात्मक सुधारणांनी त्याची तीव्रता कमी होईल, असे मूडीज इनव्हेस्टर्सने म्हटले आहे.