नवी दिल्ली- टाटा ट्रस्टने पीपीई किट, सर्जिकल मास्क आणि ग्लोजसारखे महत्त्वाचे वैद्यकीय साहित्य एअरलिफ्ट करून देशाच्या विविध भागात पोहोचविले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी टाटा ट्रस्टने टाटा इंटरनॅशनलच्या सहाय्याने हे मदतकार्य आज केले आहे.
अत्यंत तातडीची गरज असलेल्या ठिकाणी विविध वैद्यकीय साहित्य पोहोचविले जाणार असल्याचे टाटा ट्रस्टने म्हटले आहे. यामध्ये मास्क, पीपीई किट, एन ९५ आणि केएन ९५ मास्क आदींचा समावेश आहे. टाटा ट्रस्टने एकूण १५० कोटी रुपयांचे वैद्यकीय साहित्य देण्याचे जाहीर केले आहे.