नवी दिल्ली- कोरोनाने उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. एनपीपीएने उत्पादकांकडून एड्स, मलेरिया आणि पॅरासिटिमॉल अशा विविध औषधी साठ्याची उत्पादकांकडून माहिती मागविली आहे.
एनपीपीए उत्पादकांकडून रोज गोळ्या उत्पादनाची क्षमता, गोळ्यांचा साठा, निर्यातीची क्षमता आणि देशातील बाजारपेठेत उपलब्ध करण्याचे प्रमाण याची आकडेवारी मागविली आहे. औषधी घटकांची १५ मार्च २०२० पासून किती आयात केली आहे, याची माहितीदेखील उत्पादकांना द्यावे लागणार आहे.