नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) महामार्गांवरील टोल वसुली आजपासून सुरू केली आहे. टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने काही अटींवर उद्योग सुरू करण्यास आजपासून परवानगी दिली आहे.
नवी दिल्लीमधील बादरपूर व मुंबईमधील वाशीजवळही टोल नाक्यांवरून टोल घेतला जात आहे. टोल कर्मचारी हे कामावर परतले आहेत. केंद्र सरकारने २५ मार्चला टाळेबंदी लागू केली आहे. टाळेबंदी १५ एप्रिलला संपत असताना ती ३ मेपर्यंत वाढविली आहे.