नवी दिल्ली - कोरोनाने अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने उद्योगांच्या संघटनांसाठी मार्गदर्शक सूचना काढल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन द्यावे, असे सरकारने म्हटले आहे.
उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाने उद्योगांच्या तीन संस्था आणि कंपन्यांचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकांना मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत. यामध्ये एमएसएमईचे पुरवठादार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देऊन उदरनिर्वाहासाठी सहकार्य करावे, असे म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाने आर्थिक संकट : एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांचे भत्ते १० टक्क्यांनी कमी