नवी दिल्ली - कोरोनाच्या महामारीत ऑनलाइन शिकणे आणि कौशल्य विकासाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय व्यवसायिकांमध्ये डिजिटल कौशल्य आणि दूरस्थ पद्धतीने काम करण्यात वाढ झाल्याचे लिंकडिन या प्रोफेशनल समाज माध्यमाने म्हटले आहे.
लिंकडिन लर्निंगच्या आकडेवारीनुसार ऑनलाईन शिकण्याच्या प्रमाणात देशात गतवर्षीच्या जुलैच्या तुलनेत २४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. लिंकडिनने वर्षभरात लोकप्रिय ठरलेल्या कोर्सची यादी आज प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भारतीयांनी पायथॉन, घरातून काम करताना वेळेचे व्यवस्थापन, नोकरीसाठी अर्ज करताना रणनीतीचा विचार, एक्सेलचे महत्त्वाचे प्रशिक्षण, रिमोर्ट वर्क फाउंडेशन आदी कोर्सचा समावेश आहे.
हेही वाचा-एजीआरच्या निकालानंतर व्होडाफोन आयडिया रोखे आणण्याच्या प्रस्तावावर करणार विचार
लिंकडिन टॅलेंट आणि लर्निंग सोल्यूशन्सचे संचालक रुची आनंद म्हणाले, की व्यवसायिक हे दूरस्थ पद्धतीने काम करताना नवीन सामान्यस्थितीप्रमाणे बदल करत आहेत. गतवर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये तीनपट ऑनलाईन शिकण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये डिजीटल कौशल्य आणि दूरस्थ पद्धतीने काम करताना सॉफ्ट स्किल्स शिकण्यासाठी सर्वाधिक रस व्यवसायिक लोकांनी दाखविला आहे. लिंकडिन लर्निंगमधून विविध १६ हजार ४०० प्रोग्रॅम शिकता येतात. तर ६०० हून अधिक कोर्स हे जगभरातील सात भाषांत उपलब्ध करण्यात आले आहेत.
हेही वाचा-बँका कर्जाची पुनर्रचना करण्यास मुक्त; मात्र कर्जदारांना दंड आकारता येणार नाहीत