महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बंगळुरू : कोरोनाच्या भीतीने इन्फोसिसने बंगळुरूमधील इमारत केली रिकामी - कोरोना

हैदराबादमध्ये चिकनचे दर घसरले आहेत. हैदराबादमधील किरकोळ चिकनचे विक्रेते शेख मुनावर यांनी अडीच किलो चिकन केवळ १०० रुपयांना विकत असल्याचे सांगितले.

COVID 19
कोविड १९

By

Published : Mar 14, 2020, 3:14 PM IST

बंगळुरू- बंगळुरूच्या दक्षिण भागातील उपनगरात इन्फोसिसची इमारत आहे. एका कर्मचाऱ्याला कोव्हिड-१९ ची लागण झाल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. 'कोव्हिड १९'च्या भीतीने देशातील विविध शहरांच्या उद्योगांवर परिणाम होत आहे.

कोरोना विषाणुचे भय; चिकनच्या विक्रीवर हैदराबादमध्ये परिणाम

कोरोनावरून पसरत असलेल्या समाज माध्यमातील अफवांमुळे कुक्कुटपालन उद्योग संकटात आहे. त्यामुळे चिकनच्या विक्रीत कमालीची घट झाली आहे. हैदराबादमध्ये चिकनचे दर घसरले आहेत. हैदराबादमधील किरकोळ चिकनचे विक्रेते शेख मुनावर यांनी अडीच किलो चिकन केवळ १०० रुपयांना विकत असल्याचे सांगितले.

१४ मार्च १३:२०

बंगळुरूमधील मॉल, चित्रपटगृहे बंद

महामारी 'कोविड १९'च्या भीतीने बंगळुरू शहरामधील मॉल, चित्रपटगृहे, नाईट क्लब, पब्स आणि जलतरणतलाव पुढील आठवड्यापर्यंत बंद राहणार आहेत.

हेही वाचा-बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळातून पायउतार

१४ मार्च १३:०७

कोरोनाची लक्षणे आहेत की नाही, हे तपासणारी वेबसाईट गुगलची मालकी असलेली अल्फाबेट कंपनी तयार करत आहे. ही माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. गुगलचा एक्स लॅबचा मूनशॉट कोव्हिड-१९ ची लक्षणे ओळखणारे टूल तयार करत आहे. याची माहिती गुगलने ट्विटरवरून दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details