कोची (केरळ) - कोरोनाचा प्रसार होत असताना अनेकजणांना त्याबाबत पूर्णपणे माहिती नाही. ही बाब लक्षात घेवून केरळ स्टार्टअप मिशन (केएसयूएम) या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेने दोन रोबो लाँच केले आहेत. या रोबोची खासियत म्हणजे हे रोबो कोरोनाबाबत जनजागृती करतात.
केएसयूएमच्या कॉम्पलेक्समध्ये रोबो हे फेसमास्क्स, सॅनिटायझर आणि नॅपकिनचे वितरण करतात. तर दुसऱ्या रोबोटच्या स्क्रीनवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी घोषित केल्याचे दिसत आहे. हा रोबो दरवाजेही स्वच्छ करतो. कोरोनावर विचारलेल्या प्रश्नांचेही उत्तरे रोबो देतो.