नवी दिल्ली - कोरोना विषाणूजन्य रोगाचे जगभरात प्रमाण वाढत असताना केंद्र सरकारने देशात खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्व मोठ्या १२ बंदरावर तातडीने निर्जुंतुकीकरण आणि प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जहाजबांधणी मंत्रालयाने एन-९५ मास्क खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच थर्मल स्कॅनरने प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. चीनमधील वुआन शहरामधून कोरोनो विषाणुजन्य रोगाची जगभरातील २५ देशात लागण झाली आहे. तर केरळमध्येही दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.