नवी दिल्ली/लखनौ- प्राणघातक कोरोनाने जगभरात थैमान घातल्यानंतर भारतात प्रवेश केला आहे. देशात तीन रुग्ण आढळल्यानंतर अनेक उद्योगांवर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.
आग्र्याच्या ताजमहालला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये विदेशी नागरिकांची संख्या लक्षणीय असते. इटली, इराण आणि चीनमधील पर्यटकांची पहिल्यांदा मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला माहिती द्यावी, अशी सूचना हॉटेल आणि पर्यटनस्थळांच्या यंत्रणेला देण्यात आली आहे.
पर्यटकांना कोविड-१९ ची लक्षणे दिसत असल्याच त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची पथक नेमण्यात आले आहे. ही माहिती आग्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश वत्स यांनी दिली. ते म्हणाले की, हॉटेलमध्ये जावून डॉक्टर पर्यटकांची तपासणी करत आहेत. कोरोना विषाणुबाबत भारत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानहून येणाऱ्या पर्यटकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी सरकारने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचे व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द केले आहेत.
हेही वाचा-७,७९६ कोटी रुपयांची खोटी जीएसटी बिले: अधिकाऱ्यांकडून 'गोरखधंदा' उघडकीस