नवी दिल्ली- कोरोनामुळे विमान कंपन्यांनी धसका घेतला आहे. कोरोनाचा जगभरातील प्रसार पाहता गोएअरने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत.
आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे १७ मार्च ते १५ एप्रिल २०२० पर्यंत रद्द करण्यात आल्याचे गो एअर इंडियाने म्हटले आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जगभरातील देशांनी मागदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याचा मोठा फटका विमान वाहतूक उद्योगाला बसला आहे. अनेक महत्त्वाचे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. तर अनेक ग्राहकांनी प्रवासाचे नियोजन पुढे ढकलल्याचे गोएअरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
हेही वाचा-शेतकरी अडचणीत : ‘सीसीआय’ची तीन आठवड्यांपासून कापूस खरेदी बंद