नवी दिल्ली- कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अशात खनिज तेलाची मागणी घटली असतानाही प्रमुख तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने जून २०१७ नंतर दराचा निचांक गाठला आहे.
खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर हा ९ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४५.५० डॉलर झाला आहे. चालू वर्षात ८ जानेवारीला खनिज तेलाच्या प्रति बॅरलचा दर ७१.७५ डॉलर होता. चालू वर्षात खनिज तेलाचे दर ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. खनिज तेलाचे दर घसरत असल्याने तेल कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा-आरबीआयच्या निर्बंधानंतर येस बँकेवर 'हे' नियम लागू होणार