मुंबई - टाळेबंदीत वाहतुकीवर निर्बंध आल्याने श्रेणी - 2 आणि श्रेणी - 4 शहरांमधील गोदामांचे महत्त्व वाढले आहे. या शहरामध्ये गोदामांसाठी गुंतवणूकदार पसंती देणार असल्याचे उद्योगतज्ज्ञांनी सांगितले.
गोदाम क्षेत्राचा मुख्यत: श्रेणी - 1 शहरांत विशेषत: महानगरांमध्ये भर देण्यात येतो. या क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी सरकारच्या धोरणातील बदलानंतर श्रेणी - 2 शहरांकडे वळण्यास सुरुवात केली होती. शहरीकरणासह विविध कारणांमुळे गोदामे ही मुख्य आठ महानगरांमध्ये केंद्रित झाली होती. मात्र, देशभरातील टाळेबंदीनंतर लहान शहरे ही गोदामांचे हब होऊ शकतात, असे मत मालमत्ता सल्लागार कंपनी सॅव्हिल्स इंडियाचे संशोधक प्रमुख अरविंद नंदन यांनी सांगितले.
हेही वाचा-वीज कंपनीतील कर्मचारी 1 जूनला पाळणार 'निषेध दिन'; 'हे' आहे कारण