नवी दिल्ली- औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाच्या ८ क्षेत्रांचा विकासदर जानेवारी महिन्यात गेल्या १८ महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक निचांकी पातळीवर गेला आहे. हा विकासदर १.८ टक्के असल्याचे इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने म्हटले आहे. यातून देशाची आर्थिक प्रगती मंदावली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कच्च्या तेलाचे उत्पादन, तेलशुद्धीकरण उत्पादने आणि विद्युतनिर्मिती यांच्या घटलेल्या प्रमाणामुळे औद्योगिक क्षेत्रांचा विकासदर घटल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०१९ मध्ये पायाभूत क्षेत्रांचा विकासदर हा १.८ टक्के झाला आहे. हा विकासदर जून २०१७ पासून सर्वात कमी असल्याचे इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चने म्हटले आहे.
आर्थिक प्रगती मंदावली, गेल्या १८ महिन्यांत महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकासदर निचांकी पातळीवर
कच्च्या तेलाचे उत्पादन, तेलशुद्धीकरण उत्पादने आणि विद्युतनिर्मिती यांच्या घटलेल्या प्रमाणामुळे औद्योगिक क्षेत्रांचा विकासदर घटल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०१९ मध्ये पायाभूत क्षेत्रांचा विकासदर हा १.८ टक्के झाला आहे.
जानेवारी २०१८ मध्ये महत्त्वाच्या ८ औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार हा ६.२ टक्क्यापर्यंत झाला होता. डिसेंबर २०१८ मध्ये याच क्षेत्राचा विकासदर २.७ टक्के होता.
जानेवारी २०१९ मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन ४.३ टक्के, तेलशुद्धीकरणाचे उत्पादन २.६ टक्के तर विद्युनिर्मितीचे ०.४ टक्के झाले आहे. २०१३ पासून विद्युत निर्मिती सर्वात कमी झाल्याचेही या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
असे असले तरी नैसर्गिक वायू, खते आणि स्टीलचा विकासदर हा गतवर्षीच्या तुलेत अधिक झाला आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये महत्त्वाच्या क्षेत्रांचा घटलेला विकासदर म्हणजे औद्योगिक प्रक्रिया मंदावल्याचे व आर्थिक प्रगती कमकुवत झाल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून जानेवारी २०१९ मध्ये औद्योगिक उत्पन्नाचा विकासदर कमी असेल, अशी शक्यता इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र कुमार पंत यांनी म्हटले आहे.
उत्पादन विकास दर वर्ष
कोळसा १.७ जानेवारी २०१९
सिमेंट ३.८
उत्पादन विकास दर वर्ष
कोळसा ३.८ जानेवारी २०१८
सिमेंट १९.६
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०१८-२०१९ च्या एप्रिल-जानेवारीदरम्यान ८ महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकासदर हा ४.५ टक्के नोंदण्यात आला. याच महिन्यादरम्यान गेल्यावर्षी ८ महत्त्वाच्या क्षेत्रांचा विकासदर हा ४.१ टक्के नोंदण्यात आला आहे.
Conclusion: