नवी दिल्ली - चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना टेस्ट किट या सुमारे तिप्पट दराने आयसीएमआरला विकण्यात आल्याचे समोर आले आहे. या नफेखोर कंपन्यांवर कारवाई करावी, अशी काँग्रेसने मागणी केली आहे.
काही माध्यमांमधून आलेल्या वृत्तानुसार, चीनमधून आयात केलेल्या प्रति टेस्ट किटची किंमत २४५ रुपये आहे. तर या कीट भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेला (आयसीएमआर) प्रत्येकी ६०० रुपयाला विकल्या आहेत. यामधून कंपन्यांनी १४५ पटहून अधिक नफा मिळविला आहे. किट आयात करणारी कंपनी आणि वितरक यांच्यामधील वाद दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर ही नफेखोरी उजेडात आली आहे.
हेही वाचा-'चीनबद्दलच्या जगाच्या तिरस्काराचे भारताने संधीत रुपांतरण करावे'
काँग्रेसची नफेखोर कंपन्यांवर कारवाईची मागणी-
जेव्हा देश कोरोनाच्या संकटाविरोधात लढत आहे, तेव्हा काही लोक अनुचित फायदा कमिवण्याची संधी सोडत नाही. या भ्रष्ट मानसिकतेची लाज वाटते. या नफेखोरांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केली. देश त्यांना कधीच माफ करणार नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा-फेसबुकच्या गुंतवणुकीने रिलायन्सची वाटचाल कर्जमुक्तीच्या दिशेने...
सरकारने माहिती जाहीर करण्याची मनीष तिवारींची मागणी-
गेल्या ३६ दिवसांत सरकारने किती किट आयात केल्या आहेत? किती किट देशात तयार केल्या आहेत? किती वितरित केल्या आहेत? याची संपूर्ण देशाला सरकारने स्पष्ट माहिती देण्याची गरज आहे, असे काँग्रेस नेते मनीष तिवारींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यन, चीनमधून आयात केलेले कीट सदोष आढळल्याने त्याची आयसीएमआरने दोन दिवस चाचणी थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट, राजस्थानसह इतर राज्यांत रॅपिट टेस्ट होवू शकल्या नाहीत.