महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.. उपकराचे २० हजार कोटी राज्यांमध्ये आज रात्री करणार वितरीत - Finance Minister Nirmala Sitharaman latest news

ज्या प्राप्तिकरदात्यांची उलाढाल वार्षिक 5 कोटी रुपयांहून कमी आहे, त्यांच्यासाठी दिलासादायक निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात आला आहे. राज्यांना केंद्र सरकारकडून निधीची अपेक्षा असताना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Oct 5, 2020, 8:39 PM IST

Updated : Oct 5, 2020, 10:07 PM IST

नवी दिल्ली- चालू वर्षात २० हजार कोटी रुपयांचे जीएसटी मोबदला उपकराचे संकलन झाले आहे. हा उपकराचा निधी राज्यांना आज रात्री देण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्या ४२ व्या जीएसटी बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होत्या.

राज्यांना २४ हजार कोटींच्या आयजीएसटी देण्यात येणार आहे. ज्या राज्यांना आयजीएसटीचा निधी कमी मिळाला आहे, अशा राज्यांना हा निधी पुढील आठवड्यात देण्यात येणार असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.

ज्या प्राप्तिकरदात्यांची उलाढाल वार्षिक 5 कोटी रुपयांहून कमी आहे, त्यांच्यासाठी दिलासादायक निर्णय जीएसटी परिषदेत घेण्यात आला आहे. अशा प्राप्तिकरदात्यांना दर महिन्याला जीएसटीआर ३बी आणि जीएसटीआर१ चे विवरणपत्र भरावे लागणार नाही. त्यांना तीन महिन्याला विवरणपत्र भरावे लागणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव अजय भूषण पांडे यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Oct 5, 2020, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details